Skip to content Skip to footer

कुत्रीवर हृदय शस्त्रक्रिया : वृद्ध दांपत्याने केले 11 लाख रुपये खर्च

अनेकांचं त्यांच्या पाळीव कुत्र्यावर जीवापाड प्रेम असतं. मालक कुत्र्यांवर बराच खर्चही करतात. पण हा खर्च किती असेल? लंडनमधील एका कुटुंबाने त्यांच्या कुत्रीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी तब्बल 12 हजार पाऊंड म्हणजे जवळपास 11 लाख रुपये खर्च केले आहेत. तिच्यावर दुहेरी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली असून अशी शस्त्रक्रिया कुत्र्यावर केली जाण्याची पाहिलीच वेळ आहे.कुत्रीवर हृदय शस्त्रक्रिया : वृद्ध दांपत्याने केले 11 लाख खर्च | old couple spend 11 lakh rupees for disease treatment of their pet

हे कुटुंब यूकेमधील चेशायर इथं राहतं. पॉल (64) आणि पॉलिन डेले (59) असं या जोडप्याचं नाव आहे. त्यांनी त्यांच्या लग्नाच्या 20व्या वाढदिवसासाठी जपून ठेवलेले पैसे या शस्त्रक्रियेसाठी वापरले. लोटी असं या कुत्रीचं नाव आहे. ही लॅब्रेडॉर प्रजातीची कुत्री 11 महिन्यांची आहे.

रॉयल व्हेटेरिनरी कॉलेजमध्ये 30 जुलैला ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या या कुत्रीची प्रकृती सुधारत आहे. या कुत्रीला झालेला हा आजार दुर्मीळ प्रकारातील होता. ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी या डॉक्टरांनी काही बालरोग तज्ज्ञांकडूनही मार्गदर्शन घेतलं होतं.

पॉलिन म्हणाल्या, “शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा आम्हाला आनंद झालं आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही ट्रिपवर जाणार नाही. पण लोटी आता सुटीवर जाऊ शकेल.”

“लोटीने कधीही जीव सोडला असता. तिची अवस्था एखाद्या टाइम बाँबसारखी आहे, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.”

ही शस्त्रक्रिया करण्यासाठी 4 तास लागले.

प्रा. डॅन ब्रोकमॅन आणि 10 डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.

Leave a comment

0.0/5