Skip to content Skip to footer

माझ्यावरील महाभियोगामुळे अमेरिकेचे नुकसान : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : माझ्यावर महाभियोग चालविल्यास अर्थव्यस्था कोसळेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला. व्हाइट हाउसमधील गोंधळाच्या वातावरणात दिवसेंदिवस भर पडत असून, त्यामुळे ट्रम्प यांचे अध्यक्षपद अडचणीत येऊ शकते, असा तज्ज्ञांचा दावा आहे. दरम्यान, ऍटर्नी जनरल जेफ सेशन्स यांनी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

केंद्रीय बॅंकेच्या प्रमुखांच्या शुक्रवारी आयोजित बैठकीला ट्रम्प उपस्थित होते. या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सेशन्स यांच्यावर टीकास्त्र सोडले. माझ्या विरोधात महाभियोग चालवून मला हटविल्यास अमेरिकी शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळेल आणि अमेरिकेतील प्रत्येक जण गरीब होईल. तुमचा विश्वास बसणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल, असे ट्रम्प म्हणाले. कोहेन यांच्या आरोपांनाही ट्रम्प यांनी आज उत्तर दिले. प्रचारमोहिमेतील निधीचा वापर खासगी बाबींसाठी करणे आणि निवडणुकांवर प्रभाव टाकणे अमेरिकेत गुन्हा मानला जातो.

माझ्या खिशातील पैसे दिले ! 

ट्रम्प म्हणाले की, पोर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देऊन मी कुठल्याही नियमाचा भंग केलेला नाही. हे पैसे मी माझ्या खिशातून दिले होते. प्रचार मोहिमेतील पैशातून मी ते दिले नव्हते. मी अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेतील रोजगारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आर्थिक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून माझ्या काळात मोठे काम झाले आहे. 2016च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्‍लिंटन यांचा विजय झाला असता तर अमेरिकेची आजची स्थिती अत्यंत वाईट झाली असती.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5