पालिकेच्या सर्व समित्यांमध्ये घुमणार “वंदे मातरम” पालिका आयुक्तांची मंजुरी
स्वतंत्र लढ्यात प्रेरणादायी ठरलेल्या आणि प्रखर स्वाभिमान जागवणाऱ्या वंदे मातरम या राष्ट्रगीताचा जयघोष आता बृहमुंबई महानगर पालिकेच्या वैधानिक समित्या, प्रभाग समित्या आणि इतर समित्यांमध्ये घुमणार आहे. पालिका आयुक्तांनी याबाबत ठरावाला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे महापालिकेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी ज्या प्रमाणे वंदे मातारमचे सामूहिक गायन होते त्याच धर्तीवर राष्ट्रगीत गायले जाईल.
देशप्रेम जागरूक करणाऱ्या जण गण मन या राष्ट्रगीताबरोबरच वंदे मातरम या राष्ट्रीय गीताबाबतही देशाच्या नागरिकांमध्ये अटळ स्थान आहेत. चॅटर्जी लिखित या गीताला ‘राष्ट्रीय गीता’चा मान आहे. देशाच्या भविष्य पिढीसह नागरिकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण करण्यामध्ये वंदे मातरम गीताचा मोठा सहभाग आहे.