Skip to content Skip to footer

सोशल मीडियावर ८० हजार फेक अकाउंट्स उघडून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा डाव

सोशल मीडियावर ८० हजार फेक अकाउंट्स उघडून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा डाव

सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता नवीन-नवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी एम्सने दिलेल्या अहवालानुसार सुशांतच्या हत्याचे कारण एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी नाकारला आहे. आज ९० दिवस उलटले तरी सुशांतच्या मृत्यूचे राजकारण पाहायला मिळत आहे. यातच आता मुंबई पोलिसांना सुशांत प्रकरणी बदनाम करण्यासाठी तब्बल सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एकूण ८० हजार फेक अकाउंट्स उघडण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

हिंदुस्थान टाइम्स या प्रसिद्ध वृत्तसमूहाने या संदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. तसेच या संदर्भात मुंबई सायबर सेलने अहवाल तयार केला असून सुशांत आत्महत्या व मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस बदनामी करणाऱ्या पोस्टचा उल्लेख आहे. या प्रकरणात विशेष बाब म्हणजे काही अकाउंट्स फक्त भारतातले नसून इटली, जपान, पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स आदी देशातूनही या पोस्ट करण्यात आल्या आहेत.

Leave a comment

0.0/5