राज्यात गेल्या सहा दिवसात कोरोना रुग्नांच्या संख्येत घट
सध्या कोरोनाचे संकट देशभरातून केव्हा संपुष्ठात येईल याकडे साऱ्या जनतेचे लक्ष लागले आहे. त्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्नांच्या संक्रयेत वाढ तोटा असताना आता दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. गेल्या पाच दिवसात कोरोना रुग्नांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे.
आज राज्यात दहा हजाराच्यावर कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांतील ही सर्वात कमी आकडेवारी आहे. त्यामुळे कोरोनाच चढता आलेख गेल्या पाच दिवसात खाली उतरु लागलाय, ही दिलासादायक बातमी समोर आलेली आहे.
राज्यात आज १० हजार २४४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर नवीन १२ हजार ९८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ११,६२,५८५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण २,५२,२७७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८० टक्के झाले आहे.