Skip to content Skip to footer

सुशांतच्या घरच्यांनी संपत्तीसाठी सुशांतला मृत्यूस प्रवृत्त केले, तपास करा! – प्रताप सरनाईक

सुशांतच्या घरच्यांनी संपत्तीसाठी सुशांतला मृत्यूस प्रवृत्त केले, तपास करा! – प्रताप सरनाईक

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयला दिलेल्या अहवालामध्ये सुशांतची हत्या करण्यात आल्याचे साफ नाकारत त्याचा मृत्यू आत्महत्येनेच झाला आहे, असा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. या अहवालानंतर सुशांतच्या मृत्यूला हत्येचा रंग देण्याचा प्रयत्न करत असलेल्या विरोधकांची तोंडे बंद झालेली आहे.

आता हाच मुद्धा उचलत शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विट करून सुशांतच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप लावले आहेत. आमदार सरनाईक यांनी ट्विट केले आहे की, “मुंबई पोलिसांच्या तपासाप्रमाणे सुशांतची सख्खी बहीण व त्याचे कुटुंबीय दिल्लीतील डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शन आधारे नशेची औषधे त्याला देत होते. सुशांतच्या मुंबईतील प्रॉपर्टीसाठी नैराश्य आणून आत्महत्या करण्यास त्याला त्याच्या कुटुंबीयांनी प्रवृत्त केले का? याचा मुंबई पोलिसांनी तपास करावा, अशी मी पोलीस आयुक्तांकडे मागणी करतो,” असे ट्विट त्यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5