Skip to content Skip to footer

खंडित विद्युत पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर बीकेसी मधील जम्बो कोविड सेंटरला महापौरांनी दिली भेट

खंडित विद्युत पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर बीकेसी मधील जम्बो कोविड सेंटरला महापौरांनीदिली भेट

ग्रीड फेल झाल्यामुळे मुंबईसह ठाणे आणि आजूबाजूच्या भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईत एकच गोंधळ उडाला होता. त्याचा पूर्ण परिमाण रस्ते आणि लोकल वाहतुकीवर झालेला दिसून आला होता तसेच रुगालयात उपचार घेणारे विशेष करून कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्या रुग्नांवर काही उपचार करताना अडचणी आल्या का हे पाहण्यासाठी स्वतः महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरंच्या माध्यमातून आडवा घेतला.

विद्युत वितरण व्यवस्थेतील तांत्रिक बिघाडामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्युतपुरवठा आज सकाळपासून खंडित झाल्याचे समजताच मुंबईच्या महापौर किशोरी किशोरी पेडणेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व रुग्णालयांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे की नाही? याची खातरजमा केली त्यासोबतच सर्वच रुग्णालयांच्या अधिष्ठाता सोबत चर्चा केली. त्यासोबतच बीकेसी मधील जम्बो कोविड सेंटरला भेट देऊन येथील वीज वितरण व्यवस्थेचा पेडणेकर यांनी आढावा घेतला होता.

Leave a comment

0.0/5