Skip to content Skip to footer

अपहरण झालेल्या मुलाचे तेलंगणा येथून सुटका, मुंबई पोलिसांचे सर्वत्र कौतुक

अपहरण झालेल्या मुलाचे तेलंगणा येथून सुटका, मुंबई पोलिसांचे सर्वत्र कौतुक

मुंबई पोलिसांच्या कामगिरीची दखल आजवर अनेकांनी घेतलेली आहे. तसेच त्यांच्या कामाचे अनेकांनी तोंडभरून कौतुक सुद्धा केले आहे. त्यात आणखी एका कामगिरीमुळे मुंबई पोलिसांची मान अभिमानाने उंचावलेली आहे. प्रकरण असे की, मुंबई येथे अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या ४ महिन्याच्या बालकाचे अपहरण झाले होते. या प्रकरणात कोणताही धागादोरा हाती नसताना जुहू पोलिसांनी अपहरणकर्त्याला शोधून त्या बाळाला आईच्या हाती स्वाधीन केले.

या प्रकरणात लहान बाळाची तेलंगणामधून सुटका करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांचे अपहरण करुन त्यांची विक्री करणारे मोठ्या रॅकेटचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तत्परतेने कामगिरी बजावणाऱ्या जुहू पोलिसांचे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सहआय़ुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रकरण असे की, अंधेरी येथे फुटपाथवर झोपलेल्या महिलेच्या ४ महिन्याच्या बाळाचे रात्री काही अज्ञातांनी अपहरण केले होते. या प्रकरणी पोलिसांना कोणताही सबळ पुरवा हाती न लागल्यामुळे CCTV च्या माध्यमातून पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध घेतला. अखेर एका ठिकाणी पोलिसांना थोडी माहिती मिळाली आणि त्यांनी तपास केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी तेलंगणामधील नालगोंडा इथे चार लाखात त्या बाळाला विकल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या टीमने तेलंगणामध्ये जाऊन त्या बाळाची विक्री करणाऱ्या डॉक्टरला ताब्यात घेतले आणि त्यानंतर हैदराबाद इथून एका जोडप्याच्या ताब्यातून ते बाळ सुखरुप परत आणले.

Leave a comment

0.0/5