Skip to content Skip to footer

महिलांना लोकल प्रवास करू द्या, ठाकरे सरकारची केंद्राकडे विनवणी


महिलांना लोकल प्रवास करू द्या, ठाकरे सरकारची केंद्राकडे विनवणी      

महिलांना लोकलने प्रवास करण्याची अनुमती देण्यात यावी यासाठी ठाकरे सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला पत्र पाठविले आहे. नवरात्रीच्या एका दिवस आधी सर्व महिलांना लोकलने प्रवास करण्यासाठी अनुमती देण्यासाठी परीपत्रक काढले होते. तसा प्रस्ताव राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला दिला होता.

मात्र रेल्वे बोर्डाने यासंदर्भातली संमती नाकारली. मुंबई आणि उपनगरांमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या प्रवासाचा पेच सुटला असे वाटत असतानाच रेल्वे प्रशासनाने ह्या निर्णयाला केराची टोपली दाखवत विषय तसाच तात्कळत ठेवला आहे. अशातच आता राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला विनंती करणारे पत्र पाठवले आहे. मात्र रेल्वे बोर्डाने याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. पुन्हा एकदा राज्य सरकारने महिलांना लोकल प्रवास करु द्यावा, असे आपल्या पत्रात म्हटले आहे.

शुक्रवारी नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सर्व महिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देणारे परिपत्रक राज्य सरकारने काढले होते. तसा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र रेल्वे प्रशासनाने यासंदर्भातली संमती नाकारली. त्यामुळे सरसकट सर्व महिलांना लोकलचा प्रवास करता आलाच नाही. यावर आता काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर बेछुट आरोप केले आहेत.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला महिलांसाठी रेल्वे सुरु करावीशी वाटत नाही. त्यांना यामागे राजकारण करायचं आहे असा आरोप केला होता. तसंच मंदिरं उघडण्यासाठी घंटानाद करणारे भाजपा नेते हे आता महिलांसाठी लोकल सुरु व्हावी म्हणून घंटानाद का करत नाहीत?, असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी विचारला होता. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा सरसकट सर्व महिलांसाठी लोकल सुरु करा, असं पत्र राज्य सरकारने रेल्वे बोर्डाला लिहिलं आहे.

Leave a comment

0.0/5