Skip to content Skip to footer

पुढचा महापौर शिवसेना पक्षाचा असेल, शिवसेना आमदार गीता जैन

पुढचा महापौर शिवसेना पक्षाचा असेल, शिवसेना आमदार गीता जैन

मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गीता जैन यांनी ‘मातोश्री’वर शिवबंधन हाती बांधले.

यावेळी शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित उपस्थित होते. दरम्यान, शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच जैन यांनी डरकाळी फोडली आहे. मिरा-भाईंदरमधील भाजपचे अनेक नगरसेवक संपर्कात आहेत. वेळ आल्यावर ते शिवसेनेत प्रवेश करतील तसेच मिरा भाईंदरमध्ये पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

आमदार गीता जैन या मीरा भाईंदरच्या माजी महापौर पदावर सुद्धा विराजमान राहिल्या आहेत. यावेळी तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांच्याबरोबर जैन यांचे अनेक वेळा खटके उडालेले सुद्धा दिसून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जैन यांनी आमदारकीचे तिकीट पक्षाकडून मागितले होते. मात्र पक्षाने त्यांना डावलून मेहता यांना तिकीट दिले होते. याच निवडणुकीत अपक्ष उभे राहत गीता जैन यांनी आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता.

Leave a comment

0.0/5