Skip to content Skip to footer

महानगर पालिकेच्या कार्यालयात प्रथमच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होणार साजरी

महानगर पालिकेच्या कार्यालयात प्रथमच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होणार साजरी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्यानंतर मुंबई महापालिकेच्यावतीने प्रथमच त्यांची जयंती साजरी केली जाणार आहे. शनिवारी, २३ जानेवारी रोजी बाळासाहेबांची जयंती असून प्रथमच ही जयंती महापालिकेच्यावतीने साजरी होणार आहे. आजवर बाळासाहेबांची जयंती महापालिकेच्यावतीने साजरी करण्यात येत नव्हती, परंतु या वर्षापासून या जयंतीला सुरुवात होत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी १९२६ रोजी जन्म झाला असून त्यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले. तेव्हापासून शिवसेनेच्यावतीने त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते. परंतु शिवसेना प्रमुखांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने सुरु होती. त्यानुसार बाळासाहेबांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत काही महिन्यांपूर्वी समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुषांच्या यादीत बाळासाहेबांचे नाव आल्यानंतर ही पहिलीच जयंती मुंबई महापालिकेच्यावतीने साजरी केली जाणार आहे.

Leave a comment

0.0/5