Skip to content Skip to footer

शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण

शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात सामान्य नागरिकांसोबत आघाडीच्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण लागली होती. आता त्या पाठोपाठ शिवसेना खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांना सुद्धा कोरोनाची लागण लागली आहे. या संदर्भातील माहिती खासदार शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे.
खासदार शिंदे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. असे त्यांनी म्हंटले आहे.

तसेच मंत्री जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक जयंत पाटील यांना सुद्धा कोरोनाची लागण लागली आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. “नमस्कार, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरी विलगीकरणात आहे, काळजी नसावी.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझर चा नियमित वापर करावा” असे त्यांनी म्हंटले आहे.

Leave a comment

0.0/5