Skip to content Skip to footer

LPG Price Hike: सर्वसामान्यांना आणखी एक मोठा ‘धक्का’, आतापर्यंत चक्क २२५ रुपयांनी ‘महागलं’ LPG सिलिंडर, जाणून घ्या ‘नवीन किंमती’

महाराष्ट्र बुलेटिन : वाढत्या महागाई दरम्यान सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. सोमवारी पुन्हा एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली. आठवड्यातून दोनदा एलपीजी सिलिंडरची किंमत वाढली आहे. यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी २५ रुपयांची, १४ फेब्रुवारीला ५० रुपयांची वाढ झाली होती. तसेच २५ फेब्रुवारीला पुन्हा २५ रुपयांनी वाढ झाली होती. एकूणच फेब्रुवारीमध्ये एलपीजीच्या किंमतीत १०० रुपयांची वाढ झाली. गेल्या एका महिन्यात चौथ्यांदा किंमत वाढली आहे आणि आतापर्यंत १२५ रुपयांनी वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वीच एलपीजीच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात यात दोन वेळा ५० रुपयांनी वाढ करण्यात आली. म्हणजेच आतापर्यंत एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सुमारे २२५ रुपयांनी वाढ झाली आहे.

आता आपल्याला १४.२ किलोग्रॅम विना अनुदानित गॅस सिलिंडरसाठी २५ रुपये अजून द्यावे लागतील. या किंमती आजपासून लागू होतील. यासह किंमती वाढल्यानंतर आता दिल्लीत घरगुती गॅसचा दर ७९४ वरुन ८१९ रुपयांवर आला आहे.

जाणून घ्या, या चार महानगरांमध्ये नवीनतम दर काय आहे?

– दिल्लीत नवीन किंमत ८१९ रुपये
– मुंबईत नवीन किंमत ८१९ रुपये
– कोलकातामध्ये नवीन किंमत ८४५.५० रुपये
– चेन्नईमध्ये नवीन किंमत ८३५ रुपये झाली आहे.

व्यावसायिक गॅसची किंमत किती आहे?

दरम्यान प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमतीत बदल होत असतात. १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये ९०.५० रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत या सिलिंडरची किंमत १६१४ रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये हा दर आता प्रति सिलिंडर १५६३.५० रुपयांवर गेला आहे. कोलकातामध्ये ही किंमत १६८१.५० रुपये आहे तर चेन्नईमध्ये हा दर १७३०.५ रुपये झाला आहे. यापूर्वी दिल्लीत १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत १५३३.०० रुपये, कोलकातामध्ये १५९८.५० रुपये, मुंबईमध्ये १४८२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये १६४९.०० रुपये होती.

Leave a comment

0.0/5