Skip to content Skip to footer

इराणी विद्यार्थिनीचा विनयभंग, पुण्यात प्राध्यापकाला अटक

पुणे: पुण्यातील यशवंतराव मोहिते महाविद्यालयात एका परदेशी विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी, प्राध्यापकालाच अटक करण्यात आली आहे.

भारती विद्यापीठाच्या कोथरुडमधील यशवंतराव मोहिते महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे.

अकाउंटिंगमध्ये पी एच डी करण्यासाठी एका इराणी विद्यार्थीनीला भारती विद्यापीठाच्या या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यावेळी या प्राध्यापकाने प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थीनीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला.  तिला वेगवेगळी कारणं देत चारवेळा चकरा मारायला लावल्या.

त्यावेळी लगट वाढल्याचं लक्षात आल्यानंतर या विद्यार्थिनीने कोथरुड पोलिस स्टेशनला तक्रार केली. त्यानंतर या प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी – http://ift.tt/2urtNtC

Leave a comment

0.0/5