Skip to content Skip to footer

चांदणी चौक दुमजली उड्डाण पुलाच्या कामाचा रविवारी प्रारंभ 

पुणे – पुणे शहराचे पश्‍चिम प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौक येथील वाहतूक आणि अपघातांची समस्या सोडविण्यासाठी चौकात उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाण पुलाच्या कामाचा शुभारंभ येत्या रविवारी (ता. 27) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. या वेळी खेड-सिन्नर महामार्गावरील बाह्यवळण मार्गाच्या कामाचा शुभारंभही गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

https://maharashtrabulletin.com/maharashtra-cm-swargate-pune/

चांदणी चौक येथील समस्या सुटेल अशी या पुलाची रचना करण्यात आली आहे. या पुलासोबत पाषाण-बावधन ते कोथरूड मार्गासाठी दोन सब-वे तयार करण्यात येणार आहेत. या कामासाठी केंद्र सरकारकडूनही निधी मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी उड्डाण पूल असावा, अशी मागणी होत होती. “सकाळ’ने या संदर्भात पाठपुरावा केला होता. त्यास अखेर यश आले आणि त्या ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याची मागणी आता पूर्ण होणार आहे.

नेमका प्रकल्प काय आहे 
कात्रज-देहूरोड बाह्यवळण राष्ट्रीय महामार्गावर पूल
पुलाची रुंदी 60 मीटर
अस्तित्वातील रस्त्यांचे मंजूर डीपी नकाशानुसार रुंदीकरण होणार
पाषाण-बावधन ते कोथरूडसाठी सब-वे
मुंबई महामार्गासाठी स्वतंत्र दोन लेनचे रस्ते
चांदणी चौक येथील तीव्र चढ आणि तीव्र उतार तीन पटीने कमी करणार
चौकातील वाहतूक यंत्रणा सिग्नलविरहित करणार
प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी पाच वर्षे

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5