हडपसर (पुणे): दिव्यांग असतानाही दृष्टिहिन मुलींनी दिवाळी निमित्त बनविलेल्या आकर्षक पणत्या, आकाशकंदील, मेणबत्या या वस्तू पाहून मी भारवून गेलो आहे. शाळेतील विदयार्थ्यांचे ब्रेल लेखन, वाचन आणि त्यांच्यात दडलेले सुप्त कलागुण वाखाणण्याजोगे आहेत. त्या अपंगत्वावर मात करून डोळसपणे व आनंदाने आणि अत्मविश्वासाने जीवन जगत असल्याचे त्यांच्या चेह-यावरून समजते. तर दुसरीकडे धडधाकट माणसे किरकोळ कारणावरून सतत तक्रारी करत असतात. त्यामुळे प्रत्येक माणसाकडे केवळ दृष्टी असून उपयोग नाही, तर जगण्यासाठीचा डोळस दृष्टिकोन हवा, हे मला या शाळेत आल्यानंतर शिकायला मिळाले, असे मत रिंगण सिनेमातील बालकलाकार साहिल जोशी याने व्यक्त केले.
कोथरूड येथील पुणे अंधशाळा, मुलीची येथे विदयार्थींनीनी दिवाळीनिमित्त बनविलेल्या वस्तींच्या प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी साहील बोलत होता. याप्रसंगी पुणे अंधाशाळेचे प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे, शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा रांका, राकेश मोने, राजू नंदाल, विदया गाजरे, स्नेहल माडीवाले, लिलाधर गुरव उपस्थित होते.
https://maharashtrabulletin.com/action-on-one-and-half-lakh-vehicle/
शेवाळे म्हणाले, ‘साहील जोशी हा उत्तृष्ट व गुणी बाल अभिनेता आहे. प्रतिकूल परिस्थितून त्याने यश मिळविले आहे. शुटींगमध्ये व्यस्त असतानाही तो नियमीतपणे अभ्यास करतो. रिंगण व सहयाद्री चित्रपटासाठी त्याला बेस्ट चाईल्ड अॅक्टर आवर्ड मिळाले आहे. अ ब क, पिप्सी हे त्याचे आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शीत होणार आहेत. तो सातवीत शिकत असून सकाळी परीक्षेचा पेपर देवून तो आपल्या कार्यक्रमाला हजर राहिल्याने मी त्याचे आभार मानतो. त्याच्यामधील जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याचा गुण विदयार्थ्यांनी यश मिळविण्यासाठी धडपड करणा-या प्रत्येकाने घेण्यासारखा आहे.’
प्रदर्शनात विक्रीसाठी दृष्टिहिन मुलींनी बनविलेले आकाश कंदील, पणत्या, मेणबत्या, जेली कॅंडल्स, ग्रिटींग कार्डस, बुक मेकर, नॅपकीन, डस्टर, ज्यूट पेपर्स, ज्यूट बॅग, कागदी पिशव्या, लोकर रूमाल, स्टोल, लूम कॅप, वेणी कॅप, मोबाईल कव्हर, मोजडी स्टोन माळा, ब्रेस्लेट, वायर बास्केट, टॅावेल, पंचा, आसन, डस्टर, बेडशीट, नॅपकीन आदी आहेत. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला.
हे प्रदर्शन सोमवार (ता. ९) पर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. कोथरूड येथील गांधीभवन जवळील दि पूना ब्लाईंड स्कूल अॅण्ड होम फॅार दि ब्लाईंड ट्रस्ट संचलित पुणे अंधशाळा, मुलींची हे प्रदर्शनाचे स्थळ आहे.
अधिक माहितीसाठी