बिबट्या चे लक्ष्य आता दुचाकी; जुन्नरमध्ये हल्ल्यात 5 जखमी

बिबट्या-leopard-rescue

उदापूर (ता. जुन्नर) : ओतूर ओझर मार्गावर हिवरे खुर्द (ता. जुन्नर) गावाच्या हद्दीत लोकेश्र्वर मळ्याजवळ जुन्या नेतवडफाटा मार्गाच्या दोनशे मीटर मार्गात काल गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान बिबट्या ने या मार्गावरुन जाणार्या वेगवेगळ्या दुचाकिवर हल्ला करुन तब्बल पाच जणाना जखमी केले आहे अशी माहीती नारायणगाव वनपरिमडलच्या वनपाल मनिषा काळे यानी दिली.

तसेच याच परिसरात काल बिबट्या ने एक कुत्राही रात्री ठार मारला आहे.

या बिबट्याच्या हल्ल्यात विलास लक्ष्मण वायकर, मधुकर कृष्णाजी यंधे,कैलास महादु यंधे (सर्व रा. हिवरे खुर्द, ता. जुन्नर), उषा सुभाष कदम (रा. नेतवड, ता. जुन्नर) व फारुक इस्माईल इनामदार (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) हे जखमी झाले आहे.

यातील तीन जखमीना त्वरीत वनविभागाने ओतूर प्रथमिक आरोग्य केंद्रात प्रथमिक उपचारासाठी दाखल करुन प्राथमिक उपचार केले. बिबट्याच्या हल्ल्याची बातमी समजताच जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यानी ही ओतूर प्रथमिक आरोग्य केंद्रात जाऊ बिबट्याच्या हल्ल्यात जखमीची भेट घेऊन विचार पुस केली.

https://maharashtrabulletin.com/rinku-rajguru-parent-to-make-acting-debut-marathi-film/

तसेच रात्री सहायक वनसंरक्षक वाय. बी. मोहिते यांच्या मार्गादर्शनाखाली या परिसरात वनविभाच्या कर्मचार्यानी रात्रभर गस्त घालुन ओतुर ओझर मार्गावरुन येणार्या सर्व वाहनाना व दुचाकी चालकाना बिबट्याच्या सभाव्य धोक्या बद्दल सतर्क करण्याचे काम केले.

सदर जखमींना आज शुक्रवारी सकाळी वनविभागाकडून बिबट प्रतिबंधक लस व पुढील उपचार करण्यासाठी पुणे येथिल शासकिय रुग्णालय वाय. सी. एम. येथे नेण्यात येत असल्याची माहीती वनविभागा कडुन देण्यात आली.

अधिक माहितीसाठी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here