Skip to content Skip to footer

कोथरुड डेपो येथे बसचालकांचा संप ; प्रवाशांना त्रास

पुणे: प्रसन्न पर्पल मोबाईल सोल्युशन प्रा. लि. कर्मचार्‍यांनी अचानक संप पुकारल्याने कोथरूड डेपो येथील बसचे वेळापत्रक कोलमडले. यामुळे पीएमपीएल प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.

कोथरूड डेपो मधील 101 बसेस प्रसन्न कर्मचारी हाताळतात. त्या सर्व बसेस कुंबरे पार्क येथील तळावर थांबून होत्या. पीएमपीएल कडून तीन महिन्यांचे बील प्रसन्न कंपनीला मिळाले नाही.

त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही, असे कामगारांनी सांगितले. प्रसन्नच्या नेहरुनगर येथील 99 बसेसही डेपोतून बाहेर आल्या नाहीत. कोथरूड मधील बहुतांश बस बीआरटी मार्गावर धावणाऱ्या आहेत.

इतर बसेसची रचना बीआरटी मार्गाचे दृष्टीने अनुकूल नसल्याने या मार्गावरील बससेवा विस्कळीत झाली.

कोथरूड बस डेपोचे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी सांगितले की, प्रसन्नकडील गाड्या ताब्यात घेण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. आता शेड्युल नुसार 181 पैकी 114 बस मार्गावर धावत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी कामगारांनी अचानक बंद पुकारल्याने दिवसभर प्रवाशांचे हाल झाले होते.

तो बंद अर्धा दिवस चालला. आता पुन्हा संप झाल्याने प्रवाशांची विशेषत पासधारकांची गैरसोय झाली.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5