Skip to content Skip to footer

पिस्तूल चा धाक दाखवून पुणे-नगर महामार्गावर 17 लाख लुटले

वाघोली (पुणे): पुणे-नगर महामार्गावर पिस्तूल चा धाक दाखवून 17 लाख रुपायांची रोकड लुटल्याची घटना सोमवारी (ता. 20) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लोणीकंद येथे घडली. लोणीकंद पोलिस ठाण्यापासुन काही मीटर अंतरावरच हा प्रकार घडला. या प्रकाराने पोलिसही चक्रावले आहेत.

असाच प्रकार त्याच दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटयाजवळ घडला हेाता. त्या घटनेतही पंधरा लाख रुपायांची रोकड लुटण्यात आली हेाती. या दोन्ही घटनेत लुटारु पल्सर या दुचाकीवरुन आले होते.

एकाच दिवशी पुणे-नगर महामार्गावर 30 लाख रुपायांची रोकड लुटण्यात आली. लोणीकंद येथील लुट प्रकरणी गणेश दत्तात्रय धनकवडे (वय 22, रा. धनकवडी) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, गणेश हा स्टील मार्ट कंपनीत ग्राहकांकडून मालाचे पैसे गेाळा करण्याचे काम करतो. सोमवारी दिवसभर त्याने पैसे गोळा केले.

17 लाख रुपायांची रोकड घेऊन तो पुणे येथील बॅंकेत भरण्यासाठी बुलेटवर निघाला होता. त्याने पैसे बॅगेत ठेवलेले होते. लोणीकंद येथे दोन पल्सरवरुन आलेल्या चौघांनी त्याच्या बुलेटला दुचाकी आडवी मारुन त्याला थांबविले. त्यातील एकाने त्याची कॉलर पकडली.

तर दुसर्याने त्याला पिस्तूल चा धाक दाखवून त्याच्याकडील बॅग हिस्कावली. तसेच त्याचा मोबाईलही त्यांनी नेला. यानंतर ते चौघेही वाघोलीच्या दिशेने पसार झाले. दोन्ही दुचाकीला नंबरचा फलक नव्हता.

त्यांनी तोंडाला रुमाल बांधला हेाता. या प्रकारानंतर गणेश याने पोलिसात फिर्याद दिली. लोणीकंद पोलिस पुढील तपास करीत आहेत.

पुरुषही लैंगिक अत्याचार चे बळी – राधिका आपटे

https://maharashtrabulletin.com/male-sexual-harassment-film-industry/

एकाच दिवशी लुटीच्या दोन घटना
सोमवारी सकाळी शिक्रापूर येथे पुणे-नगर महामार्गावरच भर सकाळी दुचाकीवरुन बॅंकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱया कर्मचार्याला लुटले.

त्याच्याकडेही 15 लाख रुपायांची रोकड होती. त्याला लुटण्यासाठी आलेले दोघे पल्सर या दुचाकीवरुनच आले होते. मात्र, त्यांनी कोणताही धाक न दाखवता झटापट करुन बॅग हिस्कावली. त्याच दिवशी लोणीकंद येथे रात्री लुटीची दुसरी घटना घडली. एक घटना लोणीकंद तर दुसरी घटना शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

पाळत ठेवूनच लुटले
या दोन्ही घटनेत लुटारुंनी दुचाकीधारकांना थांबवून त्यांच्याकडील रोकड लुटली. यावरुन त्यांनी कर्मचार्यांवर पाळत ठेवून लुटीचा प्रकार केल्याचे दिसून येते. या दोन्ही घटनेतील लुटारुंना पकडण्याचे पोलिसांसमेार आव्हान आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5