Skip to content Skip to footer

पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान ला नवा पोशाख

पुणे, दि. 1 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमासाठी यंदा पोशाख बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
घोळदार गाऊन आणि टोपीऐवजी आता कुडता, पायजमा आणि उपरणे असा भारतीय पोशाख राहणार आहे. पदवीप्रदान सोहळ्यातील मान्यवरांसाठी ‘पगडी’ही असणार आहे.

पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात घोळदार गाऊन आणि टोपी घालण्याची ब्रिटिशांची परंपरा अद्यापपर्यंत सुरूच राहिली. आजही बहुतांश विद्यापीठांमध्ये घोळदार गाऊन आणि टोपी हाच पोशाख असतो. काही महिन्यांपूर्वी भारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंह यांनी ही ब्रिटिशकालीन पद्धत बंद करण्याची गरज व्यक्त केली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही त्याबाबत विचाराधीन होते. अखेरीस विद्यापीठाने पदवीप्रदान कार्यक्रमासाठी पोशाख बदलण्याचा निर्णय घेतला.

गेल्या अनेक वर्षांपासून असलेला काळा गाऊन अडचणीचा ठरत होता. त्यामुळे विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमासाठीचा पोशाख भारतीय संस्कृतीला साजेसा असावा, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कुडता, पायजमा आणि उपरणे असा पोशाख ठरवण्यात आला आहे. सोबत पगडीही असेल. विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी अशा सर्वांसाठी हाच पोशाख असेल. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत पदवीप्रदानचा पोशाख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी येत्या पदवीप्रदान सोहळ्यापासून होणार आहे.

दरम्यान, व्यवस्थापन परिषदेचे बैठकीत पदवीप्रदानचा पोशाख बदलण्याचा ठराव मांडला. ते ठराव मंजूरही झाल्याची माहिती राजेश पांडे यांनी दिली. त्यामुळ गेल्या अनेक वर्षापासून जुनी पद्धत असलेली परंपरा बंद करावी, असा ठराव होता. त्यास मान्यता मिळाली आहे. आता कुडता, पायजमा, उपरणे असा भारतीय पोशाख असणार असल्याचे पांडे यांनी नमूद केले.

पुणे विद्यापीठाने पदवीप्रदान सोहळ्यासाठी पोशाख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कुडता, पायजमा, उपरणे असा पोशाखची रचना असेल. पदवीप्रदान सोहळ्यातील व्यासपीठावरील मान्यवरांसाठी पगडी असेल. येत्या पदवीप्रदान सोहळ्यात नवा पोशाख राहील. 
डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

Leave a comment

0.0/5