Skip to content Skip to footer

उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त पुणे ते दिल्ली सायकल रॅली चे आयोजन

उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त पुणे ते दिल्ली अशा सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले, “सशक्त नारी से ही बनेगा सशक्त समाज !!” असा संदेश घेऊन ही सायकल रॅली पुढील १५ दिवसात १५ शहरातून १५०० किमी चा प्रवास करून दिल्ली पर्यंत जाणार आहे. दिल्ली मध्ये जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली दिली जाणार आहे , या रॅली मध्ये २५ सायकल पटू सहभागी झाले आहेत यामध्ये महिलांचा पण सहभाग आहे. सकाळी ६:३० वा शंख वादनाने या रॅलीची सुरुवात झाली.
या वेळी उन्नति सोशल फाऊंडेशन च्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दि. ८,९, व १० मार्च रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याचे सांगितले. महिलांना सक्षम करून त्यांच्यासाठी नेहमी मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे आश्वासन त्यांनी या वेळी केले.आनंद हास्य योगा क्लब च्या सदस्या संध्या माशाळकर यांनी यावेळी “स्त्री”शक्तीचे महत्च सर्वांना पटवून दिले , स्त्री ला प्रोत्साहन द्या असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले .
या कार्यक्रमास उन्नति सोशल फाऊंडेशन च्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे,पी.के.स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे ,स्पर्श फौंडेशनचे संस्थापक भूपेंद्र सिंग राठोड , रोटरी क्लब ऑफ पुणे च्या अध्यक्षा वासवी मुळे , कविता भिसे ,उषा वाकचवरे ,राजू काटे ,बाळू काटे , बच्छराज शर्मा,रामप्रकाश गुलाब मेटे वासनकर,रमेश वाणी ,विठाई वाचनालयाचे अध्यक्ष सुभाषचंद्र पवार , RSS महासंघाचे सदस्य मीनाक्षी देवतारे , कांचन काटे , सुवर्णा काटे , मंदा वाळके, विकास काटे, केशव मुजुमदार, ऋषिकेश होणे , विवेक भिसे , आनंद हास्य योगा क्लब चे सर्व सदस्य ,नवचैतन्य हास्य क्लब चे सर्व सदस्य ,ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन, पिंपळे सौदागर चे सर्व सभासद व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे आभार सायकल पटू अनिल पिंपळीकर यांनी केले .

Leave a comment

0.0/5