Skip to content Skip to footer

सुजय विखे पाटील यांच्या आजोबाचा आम्हीच पराभव केला होता- शरद पवार

काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या परिवारातील वाद साऱ्या महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. आता या वादाला नवीन तोंड फुटले आहे.” सुजय विखे पाटील यांच्या आजोबाचा आम्हीच पराभव केला होता” असे विधान करून शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वाद आता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुजय विखे पाटील हे नगर मधून निवडणुकीला इच्छुक होते परंतु ही जागा राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेला गेल्यामुळे विखे पाटील अडचणीत आले होते. विखे पाटलांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून ते थेट काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या पर्यंत ही जागा काँग्रेसला भेटावी म्हणून प्रयत्न केले होते. परंतु राष्ट्रवादी पक्षाने ही जागा सुजय विखे पाटील यांच्यासाठी सोडलेली नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले.

सुजय विखे भाजपात तर राधाकृष्ण विखेंच राजीनामा नाही!

त्यामुळे नाइलाजाने सुजय यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना दिगवंत खासदार बाळासाहेब विखे पाटील नगर मतदार संघातून १९९१ मध्ये यशवंत गडाख यांनी पराभव केला होता. गडाख यांनी पराभव केला असला तरी खरा सामना हा विखे पाटील आणि पवार यांच्यात झालेला होता. याच निवडणुकीची आठवण शरद पवार यांनी पुन्हा एकदा करून दिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला नगर मधून राष्ट्रवादीचा कोणीही उमेदवार असला तरी खरी लढत ही पवार आणि विखे पाटील यांच्यातच असणार आहे.
शरद पवार यांच्या या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची काहीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे.
कोणत्याही परिस्थितीत नगर सोडणार नाही हे सांगताना शरद पवार म्हणाले की आमच्याकडे सुजय पाटील यांच्या नगरच्या जागेचा प्रस्ताव आलेला होता. आमच्याकडे उमेदवार नसता तर आम्ही सुजय यांच्या उमेदवारीचा विचार केला असता परंतु आहे तो उमेदवार बाजूला ठेऊन नवीन उमेदवाराला संधी देता येणार नाही असे मत शरद पवार यांनी मांडलेले होते. त्यामुळे येणाऱ्या दिवसात विखेपाटील आणि पवार यांच्यात वाद वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a comment

0.0/5