Skip to content Skip to footer

सुजय विखे भाजपात तर राधाकृष्ण विखेंच राजीनामा नाही!

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील राजकीय हालचाल मोठ्या जोरदार सुरु आहेत. आज मुंबई मधील गरवारे क्लब हाऊस इथे दुपारी 1 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुजय थोड्याच वेळात गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत.

तर , सुपुत्र सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. नैतिकतेचा प्रश्न म्हणूण राजीनामा असल्याच बोललं जात होत.

लोकसभा Election 2019 : सांगा नेटिझन्स… यंदा लाट कोणाची?

मात्र, सुजयच्या भाजप प्रवेशबाबत दिल्ली हायकमांडला कल्पना दिली. मी काँग्रेस पक्षातच आहे,राजीनामा देण्याबाबत आता विचार नाही अस राधाकृष्ण विखे- पाटील यांनी नुकतच स्पष्ट केलं आहे.

सुजय विखे यांच्या प्रचारासाठी भाजपची रणनीती काय असावी आणि पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर नेवासाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, राहुरी – पाथर्डीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात बैठक सुरु आहे.

News Link

Leave a comment

0.0/5