Skip to content Skip to footer

शिवसेनेमुळे १ लाख ३१ हजार शेतकऱ्यांना २४६ कोटी पीक विमा रक्कम मिळणार

शिवसेनेमुळे १ लाख ३१ हजार शेतकऱ्यांना २४६ कोटी पीक विमा रक्कम मिळणार

दरवर्षी दुष्काळ, गारपीट अशा नैसर्गिक आपत्ती ओढावल्याने होणारे शेतमालाचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी आपल्या पिकविम्यासाठी अर्ज करत असत. पीकविमा कंपन्या मात्र तांत्रिक अडचणी दाखवून पीकविमा देण्यास टाळाटाळ करत असत. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार शिवसेनेने महाराष्ट्रभर ग्रामीण भागात पीक विमा केंद्रांची उभारणी केली होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या दुष्काळ दौऱ्यात “शेतकऱ्यांना आडवे याल तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ” असा इशारा पीक विमा कंपन्यांना दिला होता. यानंतर पीक विमा कंपन्यांनी सोयाबीन पिकाचा विमा शेतकऱ्यांच्या पदरात टाकला आहे.

बीड जिल्ह्यातील थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल १ लाख ३१ हजार ६२८ शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून एकूण २४६ कोटींची रक्कम या शेतकऱ्यांना मिळणार आहे. सोयाबीन सोबतच इतर पिकांचा विमा मिळवण्यात सुद्धा शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. शिवसेनेच्या इशाऱ्यामुळे पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांची अडवणूक करणं सोडून त्यांची मदत करताना दिसत आहेत. परिणामी खरीप पिकांच्या विम्याचे तब्ब्ल ६४७ कोटी २९ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

शेतकऱ्यांना मिळणारी पीक विमा रक्कम बँका कर्जाच्या रकमेतून वजा करत आहेत. कर्ज आणि नुकसानीमुळे शेतकरी उध्वस्त होत असून त्यांचं कुटुंब रस्त्यावर येत आहे. अशा परिस्थितीत विम्यातून मिळालेली रक्कम बँकांनी कर्जापोटी काढून घेऊ नये अन्यथा शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिला आहे.

शिवसेनेने भरून घेतले संभाजीनगर जिल्ह्यातील तब्ब्ल ११ हजार ५०० शेतकऱ्यांचे पीक विमा तक्रार अर्ज

Leave a comment

0.0/5