Skip to content Skip to footer

बैलाच्या जागी स्वःताला जुंपणाऱ्या शेतकऱ्याला शिवसेनेची मदत

बैलाच्या जागी स्वःताला जुंपणाऱ्या शेतकऱ्याला शिवसेनेची मदत

कर्जबाजारीपणामुळे बैलजोडी घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने धाराशिव येथील मंगरूळ गावच्या एका शेतकरी दाम्पत्याने स्वतःलाच बैलाच्या जागी जुंपत शेतजमिनीची नांगरणी सुरु केली होती. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दाखवलं होतं. यानंतर या शेतकऱ्याला शिवसेनेने मदत केली आहे.

धाराशिव येथील मंगरूळ गावात राहणाऱ्या भास्कर फरताडे यांनी मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढलेलं होतं. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना त्यांच्याकडे असलेली बैलजोडी विकावी लागली होती. सध्या पेरणीचा हंगाम सुरु झालेला आहे. पेरणी करायची आहे मात्र बैलजोडी घेण्यासाठी पैसे नाहीत अशा स्थितीत असलेल्या या शेतकरी दाम्पत्याने बैलजोडीच्या जागी स्वतःला नांगराला जुंपलं. त्यानंतर कर्जबाजारी शेतकऱ्याची करून कहाणी पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आली होती.

सदर बाब धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना समजताच त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिल्लीतून दूरध्वनी करून फरताडे यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्याच्या यांच्या सुचनेनुसार संग्राम देशमुख आणि शिवसेनेचे कळंब तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी तात्काळ मंगरूळ येथे जाऊन त्या शेतकरी कुटुंबाला सोयाबीनच्या दोन बॅग व खताची दोन पोती मदत म्हणून दिली. त्याचबरोबर ट्रॅकटरने त्यांची दिड एकर शेत पेरणी करुन दिली. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला तत्परतेनं धावल्याचं चित्र पाहायला मिळालं.

शिवसेनेमुळे १ लाख ३१ हजार शेतकऱ्यांना २४६ कोटी पीक विमा रक्कम मिळणार

Leave a comment

0.0/5