Skip to content Skip to footer

युवासेनेचा दणका:विद्यार्थ्यांना थकीत फी परत मिळाली

युवासेनेचा दणका:विद्यार्थ्यांना थकीत फी परत मिळाली

दादर येथील विद्यासागर क्लासेसला शिवसेनेच्या युवासेनेने चांगलाच दणका दिला आहे. अकरावी, बारावी, नीट, सीईटी यासाठी क्लासेस लावलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी क्लासची वर्षभराची फी भरलेली होती. मात्र जानेवारी महिन्यापासून क्लासेस बंद झालेले होते. त्यामुळे जानेवारीपासूनची फी परत मिळावी अशी विद्यार्थी आणि पालकांची मागणी होती.

याबाबतचे अधिक वृत्त असे की विद्यासागर क्लासेसच्या तब्बल तेरा शाखांतील शेकडो विद्यार्थ्यांनी आपली वर्षभराची शिकवणी फी भरलेली होती.पण गेल्या जानेवारी महिन्यापासून क्लासेस अचानक बंद करण्यात आले. वर्षभराची फी भरण्यात येऊनसुद्धा क्लासेस जानेवारीपासून बंद झाल्याने जानेवारीपासूनची फी आपल्याला परत मिळावी अशी मागणी पालकांनी क्लासच्या संचालकांकडे केली होती. परंतु क्लासकडून यासाठी टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे धाव घेतली.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना घेऊन विद्यासागर क्लासेसचे संचालक कामत यांची भेट घेतली. आर्थिक तंगीमुळे क्लास बंद करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी क्लासच्या संचालकांनी विद्यार्थ्यांची फी परत देण्याची मागणी केली. अखेर क्लासच्या संचालकांनी चेकद्वारे विद्यार्थ्यांची फी परत केली. युवासेनेमुळे सहा महिन्यांपासून मिळत नसलेली फी परत मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी आदित्य ठाकरे आणि युवासेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

 

युज अँड थ्रो प्लास्टिकवर देशभर बंदी घाला-आदित्य ठाकरे

Leave a comment

0.0/5