Skip to content Skip to footer

युज अँड थ्रो प्लास्टिकवर देशभर बंदी घाला-आदित्य ठाकरे

युज अँड थ्रो प्लास्टिकवर देशभर बंदी घाला-आदित्य ठाकरे

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राप्रमाणे संपूर्ण देशभरात युज अँड थ्रो म्हणजेच वन टाइम युज प्रकारातील प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बंदी घालावी अशी मागणी केली. महाराष्ट्रात यापूर्वीच अशा प्लास्टिकवर बंदी असून यात आदित्य ठाकरेंची प्रमुख भूमिका आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम आहेत हे लक्षात घेऊन प्लास्टिकला वेळीच निर्बंध लादून नियंत्रणात ठेवावे या संकल्पनेतून आदित्य ठाकरे प्लास्टिक बंदीसाठी प्रयत्नशील आहेत.

प्लास्टिक बंदीच्या मागणीसाठी दिल्लीत दाखल झालेल्या आदित्य ठाकरेंनी यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांचीही भेट घेतली. देशातील विमानतळं प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरण अनुकूल करण्यासंबंधी चर्चा यावेळी या दोन नेत्यांमध्ये झाली. एवढंच नव्हे तर शिवसेना खासदार आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांना भेटून देशभरात तब्ब्ल ५००० इलेक्ट्रिक बस चालवून इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्याविषयी चर्चाही आदित्य ठाकरेंनी केली.

यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, एरीक सोलहेम आणि अफरोज शाह उपस्थित होते.

युवासेना कार्यकारिणीकडून दुष्काळग्रस्तांना ८७ हजार रुपयांची मदत

Leave a comment

0.0/5