Skip to content Skip to footer

पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

गडकिल्ल्यांचे संवर्धन ही शासनाची जबाबदारी आहे. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. आज उमरठ ता.पोलादपूर येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद रायगड आणि नरवीर तानाजी मालुसरे सोहळा समिती यांच्यावतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

                   मुख्यमंत्री म्हणाले की, आजचा दिवस पवित्र दिवस आहे. थोर पुरुषांचे महत्त्व माहिती असणे आवश्यक आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन आवश्यक आहे. गडकिल्ल्यांचे रक्षण शिवरायांनी केले ते आपले खरे वैभव आहे. शिवनेरीहून माती घेऊन मी आयोध्येला गेलो होतो आणि एक वर्षाच्या आत रामजन्मभूमीचा विषय पुढे आला. शिवनेरीच्या मातीमुळे मला मुख्यमंत्री पद मिळाले.

                  गडकिल्ल्यांची माती ही चमत्कार करणारी माती आहे. यात अनेकांचे रक्त सांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव म्हटले की चैतन्य येते. शासनाचे धोरण हे पर्यटन विकासाचे आहे. इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. स्वराज्य रक्षणासाठी मुठभर मावळे होते. पण त्यांची मुठ मजबूत होती. या परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5