Skip to content Skip to footer

“शिवाजी पार्क” नाही आता “छत्रपती शिवाजी महाराज पार्क”

दादरमधील शिवाजी पार्कचे नाव आता बदलण्यात आले असून, शिवाजी पार्कचे छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे नामकरण करण्यात आले आहे. बृहमुंबई महानगर पालिकेने सदर प्रस्ताव सादर केला होता तसेच तो सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे यापुढे शिवाजी पार्क असे न म्हणता “छत्रपती शिवाजी महाराज पार्क” असे नामकरण करण्यात आले आहे. महानगर पालिकेने घेतलेल्या या निर्णयाचे आता सर्व स्तरांमधून स्वागत होताना दिसत आहे.

मुंबई महापालिकेने १९२५ साली शिवाजी पार्क मैदान जनतेसाठी खुले केले. या मैदानाचे मूळ नाव माहिम पार्क असे होते. या मैदानावर एका बाजूला शिवाजी माहाराजांचा पुतळा आहे. हा पुतळा १९६६ साली उभारण्यात आला होता. शिवाजी पार्क हे मैदान मुंबईच्या दादर पश्चिम या भागामध्ये आहे. तसेच हे मैदान लोकप्रिय स्थळ आहे. शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा सुद्धा याच मैदानात साजरा होते. शिवाजी पार्कसोबत शिवसेनेचा जवळचा संबंध आहे.

Leave a comment

0.0/5