Skip to content Skip to footer

सावरकर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करा!, शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी

सावरकर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करा!, शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी

वीर विनायक दामोदर सावरकर हे आमचे सदैव मार्गदर्शक राहिलेले आहेत. वीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत शिवसेनेची मागणी सुरुवातीपासूनच राहिलेली आहे. भाजपा नेत्यांनी इतिहास चाळून पाहावा. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असून सुद्धा सावरकरांना अद्याप भारतरत्न का दिला नाही?, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सावरकरांच्या सन्मानासाठी शिवसेना जागरुक आहे. सावरकरांवर ज्यांनी आक्षेपार्ह टीका केली त्यांना आम्ही योग्य उत्तर दिले आहे. सावरकरांनी देशाचे नेतृत्व केले. अंदमानमध्ये तुरुंगवास भोगला. अशा सावरकरांबाबतीत केंद्र सरकार शांत का? जर भाजपाला सावरकरांचा योग्य सन्मान करायचा असेल तर त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे अशी शिवसेनेची मागणी आहे, असेही राऊत म्हणाले.

Leave a comment

0.0/5