Skip to content Skip to footer

विरोधकांनी कितीही पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणू द्या, आमचं सरकार पाच वर्ष टिकेल! – अनिल देशमुख

विरोधकांनी कितीही पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणू द्या, आमचं सरकार पाच वर्ष टिकेल! – अनिल देशमुख

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी तिन्ही पक्षातला समन्वय, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने घेतलेले निर्णय, कंगना तसेच अर्णब गोस्वामी प्रकरण या विषयांवर आपली मते मांडली.

शिवसेनेचा ‘उखाड दिया’ कार्यक्रम संदर्भात विचारण्यात आले तेव्हा देशमुख म्हणाले की, कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई याच्याशी राज्य सरकारचा काही संबंध नाही. हे सरकार महिलांचा आदर करत आले आहे. पण महाराष्ट्राच्या विरुद्ध कुणी काही बोलत असेल आणि त्याला एखादा राजकीय पक्ष पाठीशी घालत असेल तर ते चुकीचे आहे, असे देशमुख यांनी बोलून दाखविले.

विरोधकांनी कितीही पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणू द्या. आमचं सरकार पाच वर्ष काम करेन. तसंच त्यापुढेही आम्ही एकत्र सरकार स्थापन करु. सरकार पडणार हे विरोधकांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. विरोधकांना मुंगेरीलाल के हसीन सपने पाहण्याची सवय आहे. त्यांना स्वप्न पाहू द्यात. आम्ही महाराष्ट्राहिताचे निर्णय घेऊ, असे देशमुख म्हणाले.

Leave a comment

0.0/5