Skip to content Skip to footer

कोरोना आणि नैसर्गिक आपतींना तोंड देताना जनहिताचे निर्णय घेतले – मुख्यमंत्री

कोरोना आणि नैसर्गिक आपतींना तोंड देताना जनहिताचे निर्णय घेतले – मुख्यमंत्री

कोरोनाच्या पाश्वभूमीवर यंदाचे हिवाळी आदिवेश नागपूर येथे पार न पडता सुरक्षतेच्या दृष्टीने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस मुंबई येथे पार पडणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने जय्यत तयारी सुद्धा केली आहे. विधिमंडळाच्या सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सहा अध्यादेश, १० विधेयके मांडण्यात येणार आहेत.

मागच्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०० निर्णय घेण्यात आले असून त्यातील आठ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेली आहेत. कोरोना आणि पाऊस या संकटांशी सामना करीत राज्य सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे उदगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5