Skip to content Skip to footer

दानवे यांची जीभ छाटणाऱ्या व्यक्तीला १२ लाखाची गाडी आणि १० लाख रुपये रोख बक्षीस

दानवे यांची जीभ छाटणाऱ्या व्यक्तीला १२ लाखाची गाडी आणि १० लाख रुपये रोख बक्षीस

देशात लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे यासाठी मागील अनेक दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. यावर मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य करताना, शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्त्यव्यावरून जोरदार टीका दानवे यांच्यावर झाली होती.

त्यातच रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा विरोध दर्शवत यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना रस्त्यावर उतरली. दानवे हे शेतकरी विरोधी नेते असून शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या मंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाख रुपये बक्षीस आणि १२ लाखाची चारचाकी वाहन भेट देऊ अशी घोषणा यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनी केली.

या आंदोलनात रावसाहेब दानवे विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि पुतळ्याला चपलांनी बदडल्यानंतर त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र वेळीच पोलिसांनी धाव घेत पुतळा जाळण्यापासून शिवसैनिकांना रोखले होते. तसेच या सर्व प्रकरणात शिवसैनिक आणि पोलिसात चांगलीच झटापट देखील झाली.

Leave a comment

0.0/5