Skip to content Skip to footer

भारतात पुढच्या आठवड्यात मिळू शकते ऑक्सफर्ड लसीला मान्यता

भारतात पुढच्या आठवड्यात मिळू शकते ऑक्सफर्ड लसीला मान्यता

ऑक्सफर्ड लसीने विकसित केलेल्या कोविड लसीला पुढच्या आठवड्यात मान्यता मिळू शकते. त्यामुळे आपत्कालीन वापरासाठी भारतात पुढच्या आठवड्यात मान्यता मिळू शकते. यासाठी यंत्रणांनी मागितलेला अतिरिक्त डाटा स्थानिक उत्पादकांनी सादर केला आहे.

या सर्व घडामोडीशी निगडित असलेल्या दोन सूत्रांनी रॉयटर्सला ही माहिती दिली. ब्रिटिश औषध उत्पादकाच्या लसीला मान्यता देणारा भारत पहिला देश ठरु शकतो. ब्रिटनमधील औषध नियंत्रक ऑक्सफर्ड लसीच्या मानवी चाचणीच्या डाटाचे विश्लेषण करत आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. पुढच्या महिन्यापासून भारताला आपल्या देशातील नागरिकांचे लसीकरण सुरु करायचे आहे.

मध्यम, अल्प उत्पन्न गटातील देश तसेच उष्ण वातावरणातील देशांसाठी ऑक्सफर्डची लस मोठी आस आहे. महत्त्वाचं म्हणजे ही लस स्वस्त आहे. फ्रिजमध्ये सामान्य तापमानातही ही लस स्टोअर करता येऊ शकते. फायझरची लस स्टोअर करणे त्या तुलनेत एक मोठे आव्हान आहे. भारतात CDSCO ने नऊ डिसेंबरला, तीन कंपन्यांनी आपातकालीन परवान्यासाठी केलेल्या अर्जाचा आढावा घेतला.

Leave a comment

0.0/5