अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच आढळले विधिमंडळातील ३२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्या वाढत्या रुग्णसंख्येत यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु करण्यात आले आहे. मात्र कोरोना चाचणी करून आमदारांना तसेच विधानभवनातील कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टेस्टमध्ये एकूण ३२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले होते आजपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनासाठी साधारणपणे एकूण ३ हजारांपेक्षा जास्त कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यात मंत्रालय विधिमंडळ कर्मचारी,पोलीस, सुरक्षारक्षक प्रसारमाध्यम तसेच उपस्थित राहणाऱ्या सर्व आमदारांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत हाती आलेल्या माहिती नुसार तीन हजार पैकी ३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात विधिमंडळ मंत्रालय कर्मचारी तसेच पोलीस सुरक्षारक्षक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा विधानभवनात भीतीचे वातावरण पसरले आहे.