Skip to content Skip to footer

बाणेरच्या बिटवाईज चौकातील सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरणाचे काम मार्गी

महाराष्ट्र बुलेटिन : बाणेरच्या बिटवाईज चौकातील सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरणाचे काम मार्गी लागले आहे. गेल्या दोन वर्षांपासून भेडसावणाऱ्या या समस्येपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रस्त्याच्या रुंदीकरणाचा तसेच चौकाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून शहरातील एन्ट्री पॉईंट सुंदर आणि सुसज्य होणार आहेत. नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या निधीतून ३० लाख आणि पालिका पथ विभागाकडून ३२ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. ही विकासकामे मार्गी लागल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, “या भागात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना सतावत होती. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. नागरिक मागच्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम व्हावे याबाबत मागणी करत होते. दरम्यान संबंधित जागा मालकांशी तडजोड करत जागा ताब्यात घेऊन रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. या रस्त्याचे काम होत असल्यामुळे मला समाधान वाटत आहे.”

Leave a comment

0.0/5