Skip to content Skip to footer

दिलासादायक: बाणेर येथे सुरू होत आहे २०० बेडचे दुसरे कोविड हॉस्पिटल

दिलासादायक: बाणेर येथे सुरू होत आहे २०० बेडचे दुसरे कोविड हॉस्पिटल

महाराष्ट्र बुलेटिन : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बाणेर येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कोविड हॉस्पिटलच्या इमारतीची पाहणी महापौर व महापालिका आयुक्त यांच्यासह नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली.

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बाणेर सर्व्हे नं ३३ येथे दुसऱ्या कोविड हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आहे. या इमारतीची पाहणी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, सभागृह नेते गणेश बिडकर, शहर अभियंता वाघमारे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, आशिष मालपाणी यांनी केली.

दिलासादायक-बाणेर-येथे-सु-Comfortable-Baner-here-Su

विशेष म्हणजे या हॉस्पिटलमध्ये सुमारे १५० ऑक्सिजन बेड व ५० आयसीयू बेड असे तब्बल २०० बेड नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत आणि जवळपास १ महिन्यात काम पूर्ण होणार असून नागरिकांना सुविधा देण्यासाठी हे हॉस्पिटल सज्ज होणार आहे.

या हॉस्पिटलचे काम महापौर निधीतून व सीएसआर फंडामार्फत होत असून या हॉस्पिटलमुळे बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, पंचवटी, सोमेश्वरवाडी, सूस, म्हाळुंगे या परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a comment

0.0/5