Skip to content Skip to footer

स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर सात रुपयांनी महागला, गेल्या वर्षीपासून 68 रुपये वाढ

नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या अंशदानित गॅस सिलिंडर च्या दरात सात रुपये वाढ करण्यात आली आहे. सरकारने दरमहा दरवाढीचे धोरण स्वीकारले असून.

गेल्या वर्षी जुलैपासून अंशदानित गॅस सिलिंडर च्या दरात 68 रुपये वाढ झाली आहे.

विना अंशदानित गॅस सिलिंडर च्या दरात 73.5 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, तो आता 597.50 रुपयांवर गेला आहे. जून 2016 मध्ये अंशदानित गॅस सिलिंडरचा दर 419.18 रुपये होता.

केंद्र सरकारने अंशदानित गॅस सिलिंडरवरील अंशदान टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत दर महिन्याला दरवाढ करण्यात येत आहे.

स्वयंपाकाच्या अंशदानित 14.2 किलोच्या सिलिंडरचा दर दिल्लीत आता 487.18 रुपये झाला आहे. याआधी तो 479.77 रुपये होता,

अशी महिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिली. प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 12 सिलिंडर अंशदानित दराने देण्यात येत आहेत. त्यापुढील सिलिंडर बाजारभावाने खरेदी करावे लागत आहे.

https://maharashtrabulletin.com/brics-china-india-pakistan-terrorism/

केरोसिनचा दरही वाढला 
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून देण्यात येणाऱ्या केरोसिनच्या दरात प्रतिलिटर 25 पैसे वाढ करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी जुलैपासून केरोसिनच्या दरात दर पंधरवड्याला 25 पैसे वाढ करण्यात येत आहे.

केरोसिनचा दर आता प्रतिलिटर 22.27 रुपये झाला आहे. जुलै 2016 रोजी केरोसिनचा दर प्रतिलिटर 15.02 रुपये होता.

https://maharashtrabulletin.com/pan-and-aadhar-card-link/

विमान इंधनाच्या दरात वाढ 
विमान इंधनाच्या दरात चार टक्के म्हणजेच प्रति किलोलिटर 1 हजार 910 रुपये वाढ करण्यात आली आहे.

याआधी प्रति किलोलिटर 48 हजार 110 रुपये असलेला दर आता 50 हजार 20 रुपयांवर गेला आहे.विमान इंधनात 1 ऑगस्टला 2.3 टक्के वाढ करण्यात आली होती.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5