Skip to content Skip to footer

बँक भरती २०१८ : ‘या’ भारतीय बँकेमध्ये आहेत नोकरी च्या संधी

नवी दिल्ली – तुम्हाला बँकेमध्ये नोकरी करायची आहे तर आताचा तयारीला लागा. कारण देशातील काही बँकामध्ये मॅनेजर पदापासून ते सिक्युरिटी आॅफिसर आणि अप्रेंटिस साठीच्या रिक्त पदासाठी भरती होणार आहे. यासर्व नोकरीसाठी तुम्हाला आॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) ने डिप्टी मॅनेजर (सिक्युरिटी) आणि फायर स्टेशन पदासाठी भरती काढली आहे. एकूण 48 पदे असून 24 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. यासंबंधी अधिक माहिती एसबीआय च्या संकेतस्थळावरून तुम्हाला मिळू शकते.

अशाच प्रकारे विजया बँकेत सुध्दा प्रोबेशनरी असिस्टेंट मॅनेजर (क्रेडिट) पदासाठी भरती होणार आहे. विजया बँकेत एकून 330 पदे असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर अशी आहे. अधिक माहिती विजया बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आंध्रा बँकेतही सिक्युरिटी आॅफिसर पदाच्या 20 जागेसाठी भरती निघाली आहे. यासाठी 23 सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन पध्दतीने अर्ज करू शकता.

Leave a comment

0.0/5