Skip to content Skip to footer

रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण २०२२ पर्यंत होईल.

नवी दिल्ली – हजारो किलोमीटरच्या लोहमार्गांचे प्रचंड जाळे असलेल्या भारतीय रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने २०२२ ही नवी डेडलाइन काढली आहे.

रेल्वे मंडळाच्या सूत्रांच्या माहितीनुसार संपूर्ण विद्युतीकरणामुळे गाड्यांचा सरासरी वेग किमान १५ टक्‍क्‍यांनी वाढेल व डिझेलसाठी लागणाऱ्या खर्चात वार्षिक किमान १३ हजार कोटींची बचतही होऊ शकेल.

परिणामी, रेल्वेच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल. मात्र, त्यासाठी डिझेलची इंजिने टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनांमध्ये बदलण्याची प्रक्रिया गतिमान करावी लागेल, अशीही पुस्ती रेल्वे मंडळाच्या सूत्रांनी जोडली आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5