Skip to content Skip to footer

इंधन दरवाढीचा आगडोंब | पहा करवगळता दर (प्रतिलिटर/रुपये)

नवी दिल्ली – देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९०.२२ रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर ७८.६९ रुपयांवर पोचला.

देशातील सर्व महानगरांमध्ये आज पेट्रोलच्या आज प्रतिलिटर १४ पैसे वाढ करण्यात आली. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८२.३६ रुपये, चेन्नईमध्ये ८६.१३ रुपये आणि कोलकत्यात ८४.६८ रुपयांवर पोचला. डिझेलच्या दरात आज मुंबईत प्रतिलिटर ११ पैसे आणि दिल्लीसह इतर महानगरांमध्ये १० पैसे वाढ करण्यात आली. दिल्लीत डिझेलचा दर प्रतिलिटर ७४.१२ रुपये, चेन्नईमध्ये ७८.३६ आणि कोलकत्यात ७५.९७ रुपयांवर गेला.

दर आणखी भडकणार  
सणासुदीमुळे देशभरात इंधनाची मागणी कमी होताना दिसत नाही. यापुढील काळात हे चित्र कायम राहील. यामुळे आगामी काळात इंधनदरात आणखी वाढ होईल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

इंधन दरवाढीची कारणे 
जागतिक पातळीवर खनिज तेलाची भाववाढ
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने आयात महाग
केंद्र व राज्यांचा कराचा मोठा बोजा

करवगळता दर (प्रतिलिटर/रुपये)
पेट्रोल – ४२.०४
डिझेल – ४५.३४

Leave a comment

0.0/5