Skip to content Skip to footer

पाकिस्तानचा झेंडा फडकावल्यामुळे सलमान पुन्हा अडचणीत

आता वाद आणि सलमान खान हे एक समीकरणच झाले असे म्हटले तर वावगे ठरू नये. सलमान खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता तुम्हाला सलमान खान कोणत्या प्रकरणात अडकला असा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर तो त्याच्या ‘भारत‘ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. सलमान आणि कतरिनाला या चित्रपटात पाकिस्तानचा झेंडा फडकवायचा होता. हा सीन त्याने यशस्वीरित्या केलाही. पण हे याठिकाणच्या लोकांना पाहून चांगलाच धक्का बसला. अशाप्रकारे भारतभूमीमध्ये पाकिस्तानचा झेंडा कोणी कसा फडकावू शकतो असा प्रश्न येथील स्थानिकांनी उपस्थित केला.

स्थानिकांनी या घटनेनंतर सलमान खान आणि चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल केली. त्याचबरोबर सलमान खान राहत असलेल्या ठिकाणालाही या लोकांनी घेरले. अशाप्रकारे सलमानने पाकिस्तानचा झेंडा फडकावण्यामागे दुसरे कोणतेच कारण नव्हते. तर हा चित्रपटाच्या चित्रिकरणाचा भाग होता असे निर्मात्यांनी या लोकांना बऱ्याचदा समजावले. पण निर्मात्यांचे म्हणणे एकून घेण्यात या लोकांना काडीचाही रस नसल्यामुळे चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे.

Leave a comment

0.0/5