Skip to content Skip to footer

पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांवरील हेल्मेट सक्तीच्या आदेशाला स्थगिती

पुणे – दुचाकी चालविताना हेल्मेट न घालणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यावर कारवाईला सुरुवात केली. पण सरकारी अधिकारी, कर्मचारी रस्त्यावरील गर्दीत ओळखायचे कसा आणि त्यामुळे होणारे वाद याचा विचार करून या हेल्मेटसक्तीला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली. याबाबत सरकारी कार्यालयातील विभाग प्रमुखांशी संपर्क साधण्यात येणार असून याबाबत प्रत्येक कार्यालयात जनजागृती करण्यात येणार आहे. ही कारवाई त्यानंतर सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारी कर्मचारी अधिकारी यांना पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी हेल्मेटसक्ती लागू केली. हा नियम आजपासूनच लागू करण्यात आला होता. दुचाकी चालविताना सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हेल्मेट न घालता आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

पण या घोषणेनंतर नुकतीच पोलिसांची पुन्हा बैठक झाली. वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते या बैठकीत म्हणाल्या की, सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर पहिल्या टप्यात कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. पण अधिकारी आणि कर्मचारी ओळखायचे कसे आणि गाडी अडवून प्रत्येकाकडे ओळखपत्र बघावे लागणार असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या बाबींचा विचार करिता हेल्मेटसक्तीला स्थगिती देण्यात आली असून जनजागृती झाल्यानंतर एक जानेवारी किंवा त्यापूर्वी काही दिवस अगोदर देखील कारवाईला सुरुवात होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5