भोपाळ : निवडणूक म्हटलं की सगळेच उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत असतात. सगळेच उमेदवार काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. मतदारांचं मन जिंकण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या प्रकारे प्रचार करतात. पण असे उमेदवार मीडियापासून मात्र लांब राहू शकत नाही. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत एक उमेदवार सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या उमेदवाराचं निवडणूक चिन्ह बूट आहे. भोपाळ येथून निवडणूक लढवणारे शरद सिंह कुमार सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
निवडणूक आयोगाने शरद सिंह कुमार यांना बुट हे निवडणूक चिन्ह दिल्यानंतर मत मागण्यासाठी त्यांनी वेगळाच मार्ग निवडला आहे. शरद सिंह कुमार सध्या मतदारांचे बुट पॉलिश करुन मत मागत आहेत. राष्ट्रीय आमजन पक्षाकडून निवडणूक लढवणारे शरद सिंह कुमार यांनी बुट हे चिन्ह निवडलं. हे निवडणूक चिन्ह घेण्यासाठी कोणीच तयार नव्हतं. पण या पक्षाने हे चिन्ह निवडलं. याच्या माध्यमातून ते मतदारांचा आर्शिवाद मिऴवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आगामी 28 नोव्हेबरला होणाऱ्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय आमजन पक्षाचे उमेदवार शरद सिंह कुमार यांना किती मतं मिळतात हे 11 डिसेंबरलाच कळेल. पण मत मागण्याच्या या नव्या पद्धतीने ते चांगलेच चर्चेत आले आहे. लोकांना देखील त्यांचा हा अंदाज पसंत पडत आहे. त्यामुऴे मतदार त्यांना स्विकारतात की नाकारतात हे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.