Skip to content Skip to footer

भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच स्वतःचाच पक्षाला अल्टिमेटम, वाचा..

भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा स्वतःचाच पक्षाला अल्टिमेटम, 

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आपल्या पक्षाच्या भाजपा आयटी सेल प्रमुख अमित मालवीय याला हटवण्यासंदर्भात जाहीर आवाहन आपल्या पक्षातील नेत्यांना केले आहे. या संदर्भात पुन्हा एकदा खासदार स्वामी यांनी ट्विट करत मालवीय यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

“उद्यापर्यंत अमित मालवीय यांना भाजप आयटी सेलमधून हटवण्यात आलं नाही, तर याचा स्पष्ट अर्थ आहे की पक्षाला मला वाचवायचं नाही. अशा वेळी पक्षात अशी कोणतीही व्यवस्था नाही जिथे मी माझं म्हणणं मांडू शकेल, तर मला स्वत:ला वाचवायला हवं”, असे ट्विट स्वामी यांनी केले आहे.

यापूर्वी सुद्धा स्वामी यांनी भाजपच्या धोरणाविरोधात उघड उघड विरोध दर्शवला होता. स्वामी यांनी स्वतःविषयी अमित मालवीय यांच्यावर विरोधकांकडूनही खोट्या बातम्या आणि माहिती प्रसारित करण्याची टीका केली आहे. त्यामुळे अमित मालवीय यांना पक्षातून हटवण्यात आलं नाही तर सुब्रह्मण्यम स्वामी काय भूमिका घेणार? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

Leave a comment

0.0/5