Skip to content Skip to footer

पावसाळी अधिवेशनापूर्वी पाच खासदारांना कोरोना..!

पावसाळी अधिवेशनापूर्वी पाच खासदारांना कोरोना..!

देशात कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही काही अंशतः वाढताना दिसत आहे. अशातच दिल्लीत आजपासून पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. मात्र या अधिवेशनावर देखील कोरोनाचे संकट उभे राहिलेले दिसून येत आहे.

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. मात्र त्यापूर्वी लोकसभेचे पाच सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. आणखी बऱ्याच खासदारांची सध्या कोरोना टेस्ट सुरू आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तर आता अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर पाच खासदारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या कारणाने पुढील पंधरा दिवस चालणाऱ्या अधिवेशन कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली होणार आहे. तसेच खबरदारीच्या सर्व उपाययोजना त्याठिकाणी आता वाढवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Leave a comment

0.0/5