Skip to content Skip to footer

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे ! – मुख्यमंत्री

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे ! – मुख्यमंत्री

राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मोहिम कोरोना संकटकाळातही सुरु आहे. याअंतर्गत आतापर्यंत साडेएकोणतीस लाख शेतकरी कर्जमुक्त झाले आहे. तसेच शेतकऱ्यांकडून विक्रमी कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना शेतमालाला मिळणाऱ्या कमी भावाच्या चिंतेतून मुक्त करण्यासाठी ‘जे विकेल तेच पिकेल’ ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत कुठल्या पिकाला कुठल्या भागात बाजारपेठ उपलब्ध राहणार आहे. तसेच बाजारात कुठल्या दर्जाचे पीक अपेक्षित आहे, याचा अभ्यास कृषि विभागाकडून करण्यात येईल आणि त्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा हमखास चांगला भाव मिळू शकणार आहे, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांचा नाशिवंत शेतमाल जास्त काळ टिकवण्यासाठी शीतगृहांची साखळी निर्माण करण्यात येणार असून, त्यामुळे मागणी असणाऱ्या बाजारात शेतमाल विकण्यास शेतकऱ्यांना मदत होईल, असे बोलून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

Leave a comment

0.0/5