Skip to content Skip to footer

भाजप नेते आणि निकटवर्तीयांवर बलात्कार गुन्ह्यांचा सिलसिला सुरूच

भाजप नेते आणि निकटवर्तीयांवर बलात्कार गुन्ह्यांचा सिलसिला सुरूच

भाजपाचे स्थानिक नेते सय्यद मुन्नावर हुसेन यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यावर आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींवर बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतायांच्यावर एका महिलेने लैगिक शोषणाचा आरोप लगावला होता. लगेच त्यांचे निकटवर्तीय सहकारी तथा भाजपा नगर सेवक प्रकाश केळुसकर यांच्या भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२०१९ साली काँगेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार्‍या सय्यद मुन्नावर हुसेन हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांचे भाऊ आहेत. सय्यद हुसेन यांनी त्यांच्या कंपनीत २०१२ पासून काम करणार्‍या एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याच कंपनीत दोघांची ओळख झाली त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करणार म्हणून २०१२ पासून सुरुवातीला अनेक लॉजवर व नंतर तिच्या घरीच वारंवार शरीरसंबंध ठेवले. या दोघांमध्ये प्रेम संबंध असल्याची माहिती त्याच्या पत्नीला मिळाली. त्यानंतर त्या दोघा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यानंतर फिर्यादी महिलेने त्याच्या कंपनीतून काम सोडले. कामासाठी आणि राहण्यासाठी दुसरीकडे गेली.

काम सोडल्यानंतरही त्याने मी तुझ्याशी दुसरे लग्न करेन म्हणून शरीरसंबंध ठेवले. या दोघांमध्ये नवरा-बायकोसारखे संबंध होते, असे ती महिला सांगते. ७ ऑगस्ट २०२० रोजी त्याच्याकडे खर्चासाठी पैसे मागितले असता त्याने पैसे न देता तिला मारहाण केली. त्याची तक्रार काशिमीरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानंतर त्या महिलेने त्याच्या वैवाहिक जीवनाची चौकशी केली असता त्याने २०१७ मध्ये दुसरे लग्न केल्याची माहिती समजली. त्यानंतर या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने २०१२ पासून आतापर्यंत वारंवार शरीरसंबंध ठेवले. त्यामुळे फसवणूक झाल्याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5