Skip to content Skip to footer

“आमचं ठरलय” या गाण्याने कोल्हापुर करांना भूरळ……

जगात भारी आम्ही कोल्हापुरी” हे तर जग जाहीर आहे. कोल्हापुरात घडणारी घटना महाराष्ट्रात प्रसिद्ध होत नाही असे होऊ शकत नाही. सध्या कोल्हापुरात आमचं ठरलय या गाण्याने सर्व कोल्हापुरातील तरुणांना वेड लावले आहे. पण या गाण्याचा वेगळेपणा म्हणजे शिवसेना पक्षाच्या गाण्याची झलक सुद्धा या गाण्यात ऐकू येत आहे. तसेच कोल्हापुरातील वजनदार नेते म्हणून समजले जाणारे माजी मंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला “आमचं ठरलय” या भव्य बॅनरने कोल्हापुराचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील नेत्यांचे लक्ष कोल्हापुरात या बॅनरकडे वेधून घेतले आहे.

कोल्हापूर शहरात राष्ट्रवादीकडून महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तर महायुतीकडून प्रा. संजय मंडलिक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. पण या निवडणुकीला आमदार सतेज पाटील यांनी आपला पाठिंबा महाआघाडीच्या उमेदवाराला न देता शिवसेना उमेदवार प्रा. मंडलिक यांना दिलेला आहे. आज कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील हे वजनदार नेते आहे. तसेच महाडिक यांनी २०१४ च्या आमदारकीला नियम प्रमाणे पाटील यांना मदत करणे आपेक्षित असताना सुद्धा त्यांनी भाजपा उमेदवार आपले बंधू आमल महाडिक यांना मदत करून जिंकून आणले होते.

हाच राग मनात ठेऊन गद्दारी करणाऱ्याला मदत न करण्याचे आमदार सतेज पाटील आणि समर्थकांनी ठरविले आहे. म्हणुनच गद्यराला धडा शिकवण्यासाठीच “आमचं ठरलय” या गाण्याची प्रसिद्धता अख्या कोल्हापुरात वाढताना दिसत आहे. तसेच प्रचार करताना सुद्धा प्रा. संजय मंडलिक यांच्या डोक्यावर या टॅग लाईनची टोपी दिसल्यामुळेच कुठे तरी राष्ट्रवादी पक्षाला धडा शिकवण्याचे आमदार सतेज पाटील यांनी ठरविलेले आहे असेच समजते. यावर येणाऱ्या निवडणुकीला कोल्हापुरात शिवसेना-भाजपा-काँग्रेस अशी नवीन युती बघायला भेटत आहे.

Leave a comment

0.0/5