Skip to content Skip to footer

भाजपा नेत्याचं वाचाळ वक्तव्य, कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेल..

भाजपा नेत्याचं वाचाळ वक्तव्य, कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेल..

मला कोविडची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार अनुपम हाजरा यांनी कोलकत्ता येथे केले आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील बरईपूर येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

जर मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन. कारण या संकटात त्यांनी कोरोनाबाधितांना खूप चुकीची वागणूक दिली आहे, असे आरोप त्यांनी ममता बॅनर्जींवर लगावला होता. कोरोनाबाधित मृतदेहांवर रॉकेल टाकून जाळलं आहे. अशा प्रकारची वर्तवणूक आपण कुत्रे आणि मांजरींसोबतदेखील करत नाही, असं अनुपम हाजरा यांनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, आमचे कार्यकर्ते कोरोनापेक्षा जास्त मोठ्या संकटांशी लढत आहेत. ते ममता बॅनर्जी यांच्याविरोधात लढत आहेत. ते कोरोनामुळे प्रभावित झालेले नाहीत. त्यांना कुणाचीही भीती वाटत नाही, असंही अनुपम हाजरा यांनी म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5